अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती – अब्दुल सत्तार
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत,अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचं सध्याचं बजेट ३० कोटी असून आगामी अधिवेशनात ५०० कोटी करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी चांगली मदत होऊन अल्पसंख्याक होतकरु मुलांना त्याचा लाभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

