अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या…
अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे. तसेच आता मुंबई विद्यापीठानेही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या १४ परीक्षा दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ३ परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
प्रथम वर्ष बीए सत्र १ आणि प्रथम वर्ष बीकॉम सत्र १ या परीक्षा २२ जानेवारी ऐवजी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी व एमएमएस सत्र २ ची परीक्षा २२ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
अयोध्येतील सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची रजा देण्यात आलीय. तर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सुट्टी जाहीर केली आहे. तसेच अनेक खासगी संस्थांनी सुट्टीचा निर्णय घेतलेला आहे.
