अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागात, पुरवठा निरीक्षक, लिपिक पदासाठी भरती…
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग,अंतर्गत “ पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरलिपिक ” पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 13 डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
पात्र उमेदवारांनी या कालावधीत https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/ या लिंकद्वारे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक १३ डिसेंबर, २०२३ रोजी ००.०१ पासून ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२३ रोजी २३.५९ पर्यंत या कालावधीत करता येईल.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या https://mahafood.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात देण्यात आली असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या संकेतस्थळाद्वारे कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात बघा.
