अपडेटशैक्षणिक

अजित पवारांची यांनी पीएच.डी.च्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी…

Share this post

पीएच.डी. (Ph.d.) करून काय दिवा काय लावणार आहे ‘या अजित पवार यांनी केलेल्या वक्यतव्यांचा राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांनी निषेध केला. समाज माध्यमांवर अजित पवार यांना ट्रोल करण्यात आले. राज्यातील काही विद्यापीठांमध्ये रॅली काढण्यात आली. राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर अजित पवार यांनी माझ्या व्यक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.

पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, काही संशोधक हे नेत्यांवर पीएचडी करताहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे,असेही अजित पवार म्हणाले.

पवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन एक वेळ बंद होईल.मात्र,सारथी, बार्टी, महाज्योती आदी संस्थांमध्ये पीएच.डी. फेलोशीपसाठी अर्ज केल्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळाल्याशिवाय हा विषय संपणार नाही,असे आंदोलन विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *