अंडी फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका…
अंडी फ्रिजमध्ये ठेवणं धोकेदायक आहे. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात.
आपल्या घरातील भाज्या,पालेभाज्या,मांस किंवा अंडी (Eggs). हे अनेक खाद्य पदार्थ आपण खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो. पण अंडी फ्रिजमध्ये ठेवणं धोकेदायक आहे.अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असे काही बदल होतात जे शरीरासाठी पोषक नसतात.
अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात होणारे बदल –
अंडी फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीनं ठेवल्यास त्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळं आरोग्याला हानी पोहोचते.
अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असणारी पोषक तत्वं कमी होतात. त्यामुळे त्यापासून मिळणारे पोषक घटक शरीराला पुरवले जात नाहीत.
फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी चवीला वेगवेगळी लागतात. बऱ्याचदा जुन्या अंड्यांतून वासही येतो.
अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळं ती कमकुवत होतात. उकडताना पटकन तुटतात.