अपडेटतंत्रज्ञान

WhatsApp Status ज्याच्यासाठी ठेवलाय, त्याला तो बघावाच लागणार, WhatsApp चे नवीन फिचर लाँच…

Share this post

जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स असून कंपनी आपल्या यूजर्स साठी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. यूजर्सना व्हाट्सअप वापरताना मजेशीर अनुभव कसा येईल याकडे कंपनी लक्ष्य देत असते. आताही व्हाट्सअपने एक नवीन फिचर लाँच केलं आहे, ज्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीसाठी स्टेट्स ठेवला आहे, त्याला तो बघावाच लागेल.

सध्या व्हॉट्सॲपवर आपण ठेवलेला स्टेटस 24 तास दिसतो. कधी कधी काहीजण विशिष्ट व्यक्तींसाठी स्टेट्स ठेवतात. मग त्या व्यक्तीने आपला स्टेट्स बघितला आहे कि नाही हे आपण सतत चेक करत राहतो… अनेकदा तर आपण टाकलेला स्टेटस (WhatsApp Status) समोरची व्यक्ति बघत पण नाही, त्यामुळे आपली मोठी निराशा होते. मात्र आता व्हॉट्सॲपने या समस्येवर उपाय शोधला आहे. आता ज्या व्यक्तीसाठी व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट केले गेले आहे त्याने ते पाहिले की नाही याची वाट पाहावी लागणार नाही.

व्हाट्सअपने स्टेटस मध्ये संपर्कांचा उल्लेख करण्याचा पर्याय दिला आहे. कॉन्टॅक्ट मेन्शन असे या फीचर्सचे नाव आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही ज्या व्हॉट्सॲप युजरचा तुमच्या स्टेटसमध्ये उल्लेख कराल त्याला तुमच्या स्टेटसची सूचना दिली जाईल. आणि त्या व्यक्तीला तुमच्या स्टेट्स बद्दल माहिती समजेल. व्हॉट्सॲप फीचर्सची माहिती देणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने या फीचरबाबत माहिती दिली आहे. हे नवीन फीचर व्हॉट्सॲप अँड्रॉइड 2.24.6.19 बीटा व्हर्जनमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. तुम्हाला या फीचर्सचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला Google Play Store वरून ही बीटा व्हर्जन डाउनलोड करावं लागेल.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *