अपडेटआंतराष्ट्रीयतंत्रज्ञानराष्ट्रीय

Aditya-L1ने घेतला सूर्याचा पहिला फोटो…

Share this post

Aditya-L1च्या SUIT पेलोडला २० नोव्हेंबर २०२३मध्ये ऑन करण्यात आले होते. या टेलिस्कोपने सूर्याचा फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयर फोटो घेतले आहेत. फोटोस्फेयर म्हणजे सूर्याचा पृष्ठभाग.

याआधी सूर्याचा फोटो ६ डिसेंबर २०२३ला घेम्यात आला होता. मात्र ती पहिली लाईट सायन्स इमेज होती. मात्र यावेळेस फुल डिस्क इमेज घेण्यात आली आहे. म्हणजेच सूर्याचा जो भाग पूर्णपणे समोर असतो त्याचा फोटो. या फोटोत सूर्याच्या पृष्ठभागावरील डाग, प्लेग आणि सूर्याचे शांत पडलले भाग दिसत आहे. या फोटोंच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास अधिक खोलवर करू शकतात.

आदित्य एल १ मोहिमेच्या यशाचा पहिला पुरावा सापडला आहे. या सॅटेलाईटच्या सोलार अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याचा पहिल्यांदा फिल डिस्क फोटो घेतला आहे. हे सर्व फोटो २०० ते ४०० नॅनोमीटर वेव्हलेंथचे आहेत. म्हणजेच सूर्य तुम्हाला ११ विविध रंगात दिसणार आहे. ही माहिती इस्रो ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल करून दिलेली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *