15 हून अधिक सहकारी बँकांवर आरबीआय कडून कारवाई…
नियमाचे पालन न करणाऱ्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवर आरबीआयने नोव्हेंबरमध्ये आरबीआयने पीएनबी, फेडरल बँक आणि बजाज फायनान्ससह 15 हून अधिक सहकारी बँकांवर कारवाई केली आहे.बँकिंगशी संबंधित नियमांबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशाराच आरबीआयने आपल्या कारवाईतून दिला आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्यात दीड डझनहून अधिक सहकारी बँका, पीएनबी आणि फेडरल बँक सारख्या मोठ्या बँका आणि बजाज फायनान्स सारख्या मोठ्या एनबीएफसीवर कारवाई करण्यात आली आहे.
या महिन्यात चार एनबीएफसी आणि दोन गृहनिर्माण वित्तसंबंधित कंपन्यांनी त्यांचे परवाने आरबीआयकडे जमा केले आहेत. तर दोन एनबीएफसीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.आरबीआयने गुजरातमधील पाच सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. या सर्व सहकारी बँका आरबीआयने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरबीआयने आता त्यांच्यावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सहा सहकारी बँकांना दंड ठोठावण्यात आला होता. याशिवाय अनेक सहकारी बँकाही इतर नियम न पाळल्याप्रकरणी दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बजाज फायनान्स आणि अॅक्सिस बँकेवरही नियमांचे पालन न केल्याच्या आरोपावरून कारवाई झाली आहे. ग्राहक सुविधा आणि कर्ज वसुलीत आरबीआयचे नियम न पाळल्याबद्दल अॅक्सिस बँकेला 90.92 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याच्या एक दिवस आधी बजाज फायनान्सला त्यांच्या दोन सेवा Ecom आणि Insta EMI कार्ड बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.