हातमाग उद्योजकांना २०० युनिट पर्यंतची वीज मोफत
हातमाग विणकरांनी लाभ घेण्याचे शासनाचे आवाहन.
वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासनानं जाहीर केलेल्या एकात्मिक आणि शाश्वत उद्योग धोरणानुसार, हातमाग उद्योजकांना आर्थिक दिलासा म्हणून २०० युनिट पर्यंतची वीज मोफत देण्याचा निर्णय शासनाच्या वस्त्रोद्योग, सहकार आणि पणन विभागानं जाहिर केला आहे.
त्यापेक्षा अधिक विजेच्या वापरावर उर्वरित रक्कम लाभार्थ्यांला भरावी लागणार आहे. लाभार्थी हातमाग विणकर असावा आणि त्याच्याकडे अधिकृत नोंदणी ओळखपत्र असावं.
गेल्या सहा महिन्यापासून लाभार्थी हातमाग विणकर असावा आणि त्याच्याकडे अधिकृत वीज कनेक्शन असावं. योजनेतले लाभार्थी ठरवण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त अध्यक्ष असतील. या योजनेचा जास्तीत जास्त हातमाग विणकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनानं केलं आहे.