सीड बॉल कॅम्पेनमध्ये विद्यार्थ्यांना मिळाले निसर्ग संवर्धनाचे धडे
आधुनिकतेच्या युगात वाढते प्रदूषण व नाविण्यकरणाच्या नावाखाली मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असून, दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत आहे, त्यामुळें पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे हा समतोल आबाधित राखण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे राहिले आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्यात बऱ्याच सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी आपल्या पद्धतीने प्रयत्न करतांना दिसतात.असेच प्रयत्न चाळीसगांव तालुक्यातील काही पर्यावरण प्रेमी सीड बॉल कॅम्पेन राबवत करीत आहे.
विद्यार्थी हे नव भारताचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धन व पर्यावरणाचे संरक्षणाचे मूल्य रुजावे यासाठी राष्ट्रीय विद्यालय (ज्यू.कॉलेज) चाळीसगांव जि.जळगांव या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंदांनी चाळीसगांव मधील सीड बॉल कॅम्पेनला भेट दिली.
सीड बॉल कॅम्पेंनचे प्रमुख हेमंत भास्कर मोरे यांनी उपस्थित शेकडो विद्यार्थांना वृक्षारोपणाचे महत्व समजावत सीड बॉल संकल्पना व प्रत्यक्ष सीड बॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, यात सहकारी सदस्य शिवकुमार देवरे व संदीप बडगुजर यांनी सहकार्य करत विद्यार्थ्यांचे शंकेचे निरसन करून सीड बॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
विद्यार्थ्यांनी देखील आवडीने सहभाग घेत शेकडो सीड बॉल तयार केले व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्हीं देखील प्रयत्न करू असा प्रण विद्यार्थ्यांनी घेतला.
याप्रसंगी प्राचार्य यशवंत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सीड बॉल कॅम्पेनच्या कार्याची स्तुती करत विद्यार्थ्यांना सीड बॉल व अन्य माध्यमातुन वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. सीड बॉल कॅम्पेनला भेट देण्यासाठी उपप्राचार्य,पर्यवेक्षक,पर्यवेक्षिका व सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.