शाहरुख खान ने साजरा केला आपला ५८ वा वाढदिवस.
शाहरुखच्या १६ चाहत्यांचे मोबाईल चोरीला.
दरवर्षी 1 नोव्हेंबरला शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मन्नत या बंगल्याबाहेर हजारो चाहते त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमतात. यावर्षीही शाहरुखचे अभिनंदन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड आदी शहरांतून हजारो चाहते आले होते, यानिमित्ताने शाहरुखचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच मन्नतच्या बंगल्याबाहेर जमले होते. किंग खानने त्याच्या बंगल्याच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्याने चाहत्यांसाठी आपले दोन्ही हात उघडून स्वाक्षरी पोजही दिली.
It’s unbelievable that so many of u come & wish me late at night. I am but a mere actor. Nothing makes me happier, than, the fact that I can entertain u a bit. I live in a dream of your love. Thank u for allowing me to entertain you all. C u in the morning…on the screen & off it
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 1, 2023
शुभेच्छा देण्यास आलेल्या चाहत्यांपैकी १६ जणांचे मोबाईल वर चोरांनी हात साफ केले आहे. याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.