शरद मोहोळ हत्येप्रकरणी ८ आरोपींना अटक…
शरद मोहोळ हत्येप्रकरणात पुणे क्राईम ब्रांचने ८ आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींना पुण्याच्या जवळील शिरवळ येथून ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून ३ पिस्टोल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे तसेच २ चारचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या.
पुण्यातील गुंड शरद मोहोळची पुण्यातील कोथरूड येथे दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं. जमीन आणि पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहोळ हत्या प्रकरणता पोलिसांना साहिल उर्फ मुना संतोष पोळेकर याच्यावर संशय होता. त्याचा पाठलाग केला असताना अनेक नाव समोर आली आहेत. त्यानुसार पोलिसांनी ८ संशयित आरोपींना अटक केली आहे. यात संतोष पोळेकर आणि त्याचा साथीदार तसेच मास्टरमाईंड नामदेव पप्पू कानगुडे उर्फ मामाला देखील अटक करण्यात आली आहे.
Gangster Sharad Mohol murder case: Pune Crime branch unit arrests 8 suspects
— ANI Digital (@ani_digital) January 6, 2024
Read @ANI Story | https://t.co/1HUiny7xFh#SharadMohol #Pune #Police pic.twitter.com/7hY2ujy1f6