अपडेटमुंबईशैक्षणिक

विद्यार्थ्यांसाठी खुसखबर, एका दिवसात मिळणार उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत…

Share this post

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत एका दिवसात देण्यास सुरू केली आहे. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याच्या ईमेलवर त्याच्या विषयाची स्कॅन केलेली उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठवली जात आहे. याची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता तो आता संपुष्टात आला आहे.

२०२३ च्या उन्हाळी सत्रापर्यंत पुनर्मूल्यांकनाचे अर्ज व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविले जात होते. पण अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करून त्याला ती उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठवली जात असे, याला विलंब लागत होता. तसेच पुनर्मूल्यांकनाच्या अर्जावरही कार्यवाही विलंबानेच होत होती.

यावर विद्यापीठाने अशा स्वरूपाची संगणकप्रणाली विकसित केली व २०२३ च्या हिवाळी सत्राच्या निकालापासून ही प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे एखाद्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फॉटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची एक लिंक उपलब्ध करून दिली आहे.

विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकद्वारे विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्याक्षणी त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांना उपलब्ध होत आहे. यामुळे पुनर्मूल्यांकनाचा विलंबही यामध्ये कमी झाला आहे. तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रतही विद्यार्थ्यास एका दिवसात त्याच्या ईमेलवर उपलब्ध झाली आहे, अशी माहिती गुण व प्रमाणपत्रे विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी दिली.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *