अपडेट

मेफथल-स्पास गोळी घेताय, शरीरावर होतील दुष्परिणाम – केंद्र सरकार कडून अलर्ट जारी…

Share this post

बहुतेक मुलींचं मासिक पाळीत पोट दुखतं अशावेळी किंवा लहान मुलांना ताप आल्यावर तर कधी सांधेदुखीची समस्या असल्यावर , वेदनांपासून आराम मिळावा यासाठी मेफथल-स्पास ही गोळी घेतली जाते.

मात्र, केंद्रीय आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन फार्माकोपिया कमिशनने (आयपीसी) या औषधातील मेफेनॅमिक ऍसिड मुळे दुष्परिणाम होत असल्याचा अलर्ट जारी केला आहे.फार्माकोपिया कमिशनने गेल्या महिन्याच्या 30 तारखेला हे अलर्ट जारी केले आहेत.

ही गोळी सामान्यतः मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी आणि संधिवातामधील वेदना शमविण्यासाठी वापरली जाते.फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्रॅम ऑफ इंडिया (पीव्हीपीआय) ने औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांवर प्राथमिक तपासणी केली. तर फार्माकोपिया कमिशनने आपल्या अहवालात या औषधामुळे अंगावर पुरळ, इओसिनोफिलिया आणि सिस्टेमिक सिंड्रोम झाल्याचे नमूद केले आहे.या गोळीमध्ये असलेल्या मेफेनामिक ऍसिडमुळे ड्रेस सिंड्रोम सारख्या गंभीर ऍलर्जीक रिॲक्शन होतात ज्याचा शरीराच्या अंतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम होतो.

ही गोळी घेतल्यानंतर कोणतीही रिॲक्शन दिसल्यास लोकांनी www.ipc.gov.in या वेबसाइटवर प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. तसेच अहवाल अर्ज भरून पीव्हीपीआय राष्ट्रीय समन्वय केंद्राला त्वरित कळवावे अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आलेल्या आहेत.तसेच हेल्पलाइन क्रमांक 1800-180-3024 वर देखील माहिती देऊ शकतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *