अपडेटनोकरी/उद्योग

भारतीय रेल्वेत होणार भरती…

Share this post

भारतीय रेल्वेकडून भरती बाबत महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने(RRB) सहाय्यक लोको पायलट पदासाठी 5500 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ज्या उमेदवारांना या असिस्टंट लोको पायलटसाठी अर्ज करायचा आहे ते RRB च्या https://indianrailways.gov.in/. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे रेल्वे विभागातील ५ हजार, ६९६ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक या व्यवसायातील NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांकडून मॅट्रिक/SSLC अधिक ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *