अपडेटपुणेशैक्षणिक

ब्रेड सँडविच आणि चटणीतून ३०० विद्यार्थ्यांना विषबाधा

Share this post

चिंचवड मधील शाहूनगर येथील डी.वाय.पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारख झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाळेत आज अल्पोपहार ठेवण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी हा मेनू देण्यात आला. अल्पोपहार घेतल्यानंतर काही मिनिटातच विद्यार्थ्यांना उलटी मळमळल्यासारखं व्हायला लागलं, काही विद्यार्थ्यांना भोवळ आली. तातडीने काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आलं.

शाळेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. स्कूल प्रशासन आणि पालकांनी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते असे पालकांनी सांगितले.

शाळेत अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड आणि चटणी मेनू होता. ३०० ते ३५० मुलांना विषबाधा झाली आहे. गंभीर घटना झालेली आहे. सर्व पालकांची माफी मागतो. हॉस्पिटलमध्ये मध्ये मुलांना घेऊन जाण्यात आलं आहे. जे काही खाण्याच साहित्य आणलं आहे. त्याची टेस्ट करणार आहोत. 1 ली ते ४ थी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना खायला दिलं आहे. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.”अभय खोतकर (संचालक, डी. वाय. पाटील शाळा) यांनी सांगितले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *