अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

बोर्डाकडून बारावी निकाल जाहीर होण्याबाबत अधिकृत घोषणा…

Share this post

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये (Feb.- March 2024) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल (12th Exam Result) मंगळवारी 21 मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळातर्फे याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा संपून सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला.त्यामुळे निकाल केव्हा लागणार ? याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या.त्यावर दहावी व बारावीचे निकाल मे महिन्यातच जाहीर केले जातील. असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले होते.त्यानुसार निकालाची तारख जाहीर झाली आहे.

बारावीचा निकाल मंगळवारी 21 मे रोजी जाहीर होणार आहे.

विदयार्थी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन निकाल पाहू शकतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *