प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी, महाराष्ट्रात सुटीचे आदेश…
प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी, सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे.
याआधी केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारितील सर्व कार्यालयांना प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर केली आहे. तसेच देशातील बऱ्याच राज्यांनी त्यांच्या कार्यालयांना प्राणप्रतिष्ठा दिनी सुटी जाहीर केली आहे.