भंडारा

पवनी गटसाधन केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा…

Share this post

पवनी : (दि.२७/अशोक गिरी) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येते.जयंतीचे औचित्य साधून शिक्षण विभाग गटसाधन केंद्र पवनी द्वारा सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे एक दिवसीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी जी.टी.सिंगनजुडे,प्रमुख अतिथी म्हणूनगटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा,विस्तार अधिकारी संजय वासनिक,सेवकराम गभने, वासुदेव नान्हे,केंद्रप्रमुख केशव बुरडे,संजय बावनकर,रमेश काटेखाये, मुख्याध्यापिका सुजाता वासनिक आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करून कविसंमेलनाला सुरुवात झाली.पवनी तालुक्यातील एकुण साठ शिक्षक नव कवींनी भाग घेऊन आपले स्वरचित कविता,चारोळ्या आणि गझल सादर करीत कुसुमाग्रज यांच्या साहित्याला उजाळा दिला.

संमेलनाचे सुत्रसंचालन डॉ.मुरलीधर रेहपाडे आणि भोजराज पडोळे यांनी संयुक्तपणे केले तर‌ आभार प्रदर्शन साधनव्यक्ती मंजुषा दलाल यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विषयतज्ञ महेंद्र वाहने, दिपाली बोरीकर,सरिता डाखोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *