न्यायालयीन कामकाजाला गती देण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड यांनी सुरू केले FASTER 2.0 पोर्टल…
हे नवीन पोर्टल कैद्यांच्या सुटकेबाबत न्यायालयाच्या आदेशांची माहिती तुरुंग प्राधिकरण, ट्रायल कोर्ट आणि उच्च न्यायालयाला त्वरित पाठवेल. यामुळे कैद्यांची सुटका करण्यात लागणारा बराच वेळ वाचेल. सध्याच्या व्यवस्थेनुसार तुरुंगातून सुटका होण्यास बराच वेळ लागतो. नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर या प्रक्रियेला गती येईल आणि कैद्यांची तात्काळ सुटका शक्य होईल.
सध्याच्या नियमानुसार, सुटका झाल्याची न्यायालयाच्या आदेशाची प्रत अनेक सरकारी विभागांतून जाते. यानंतर न्यायालयाचा आदेश तुरुंग प्राधिकरणापर्यंत पोहोचतो. आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच कारागृह प्रशासन कैद्याची सुटका करते. म्हणजे न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतरही कैद्याची तुरुंगातून सुटका होण्यास बराच कालावधी लागतो.
FASTER 2.0 व्यतिरिक्त, CJI चंद्रचूड यांनी e-SCR पोर्टलची हिंदी आवृत्ती देखील लॉन्च केली. या पोर्टलवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हिंदीत पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.CJI चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर ‘लोक न्यायालय’ म्हणून भर दिला. न्यायालयात जाण्यास घाबरू नका, असे त्यांनी जनतेला सांगितले. संविधानानुसार कोणताही वाद लोकशाही पद्धतीने सोडवला जाऊ शकतो. न्यायालये, तत्त्व आणि कार्यपद्धती राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असंही ते यावेळी म्हणाले.