नाशिक – ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या गाडी सिलेंडरचा स्फोट…
नाशिक गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावरील शांतिनिकेतन चौकात ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडर नेणारी गाडी स्पीड ब्रेकर वर आदळले त्यामुळे गाडीतील सिलेंडरचा स्फोट झाला असा अंदाज आहे. यात खाजगी कारसह रिक्षा आणि सिलेंडर नेणाऱ्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी घटनेत ड्रायव्हर जखमी असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर मागे असलेल्या स्कोडा आणि रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील ऋषिकेश होरायझन, पंचमी अपार्टमेंट, शैलजा अपार्टमेट यासह परिसरातील इतर इमारती आणि दुकानांच्या काचा फुटल्याने आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती आहे.
याची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघायची गर्दी जमली होती.