देशातील शाळकरी मुलांचा बनणार “ अपार आयडी ”
नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, भारत सरकार देशातील शाळकरी मुलांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. याला ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री- APAAR असे म्हटले जाईल.
हा नंबर पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या मुलांसाठी एक खास भारतीय आयडी असेल व हा नंबर आधार आयडीशी लिंक केला जाईल. अशाप्रकारे आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक शालेय मुलासाठी अपार ओळखपत्र बनवले जाईल, ज्यामध्ये मुलांची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल.
मुलांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी अपार आयडी उपयुक्त ठरेल. हा नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग आहे.
अपार आयडीसह, कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी, क्रीडा उपक्रम, अभ्यासक्रमेत्तर किंवा इतर शैक्षणिक क्रियाकलापांची सर्व माहिती एकत्र येईल आणि सहज उपलब्ध होईल.
मुलांनी शाळा बदलल्यास हा अपार आयडी बदलण्याची गरज भासणार नाही. अपार आयडी फक्त शैक्षणिक वापरासाठी वापरला जाईल.