टीम इंडियाचा विजयरथ सुरूच, सलग आठवा विजय…
भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपला विजयरथ कायम ठेवला आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील प्रथम स्थान कायम राखले आहे.
विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.सामन्यात विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. विराट कोहली १२१ चेंडूत १०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा १५ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या. श्रेयस आणि विराट यांच्यात १३४ धावांची शतकी भागीदारी केली.
भारताने ठेवलेल्या ३२७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी कॉक बाद झाला आहे. त्याला मोहम्मद सिराजने त्याला त्रिफळाचीत केले. त्याने १० चेंडूत ५ धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय संथ झाली.आठ षटकांनंतर संघाची धावसंख्या २१/१ अशी होती. याचाच दबाव संघावर आला आणि कर्णधार टेम्बा बावुमा बाद झाला. त्याला जडेजाने त्याला त्रिफळाचीत केले आहे. त्याने १९ चेंडूत ११ धावा केल्या.भारतीय गोलंदाजांनी अफलातून प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकलले.दक्षिण आफ्रिकेने ४० धावांत चार विकेट्स गमावल्या.दक्षिण आफ्रिकेने ८३ धावांत सर्व विकेट्स गमवल्या व भारताने एक मोठा विजय मिळवत आपले प्रथम स्थान कायम राखले.