अपडेटदुर्घटनाराष्ट्रीय

जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उड्या, झारखंडमध्ये ट्रेनखाली चिरडून १२ जणांचा मृत्यू…

Share this post

जामतारा-करमाटांर येथील कलझारियाजवळ तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवाने एवढ्या लोकांचा मृत्यू झाला. शिवाय काही प्रवाशी जखमीदेखील आहेत.

जामतारा-करमाटांर येथील कलझारियाजवळ तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवाने एवढ्या लोकांचा मृत्यू झाला. शिवाय काही प्रवाशी जखमीदेखील आहेत.

घटनास्थळी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. अंग एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रेनला अचानक थांबवण्यात आलेलं होतं. तेवढ्यात घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल ही गाडी प्रवाशांना चिरडून निघून गेली.

अपघातामध्ये मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालं आहे.रात्री ९ वाजेपर्यंत दोन जणांची ओळख पटवण्यात आलेली होती. एकाचं नाव मनिष कुमार असल्याचं सांगितलं जातंय. त्याचं आधार कार्ड रेल्वे ट्रॅकवर सापडलं आहे. दुसरं नाव सिकंदर कुमार असून त्याच्या वडिलांचं नाव आदिकाल यादव असं आहे. तो धपरी झाझा जमुई येथील रहिवाशी आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *