जळगाव जिल्ह्यात जेएन- १ चे दोन रुग्ण,आरोग्य यंत्रणा अलर्ट…
कोरोनाच्या नवा व्हेरिएट ‘जेएन १’ राज्यात पाय पसरत आहे. राज्यातील सांगली, बीड जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील दोन रुग्ण आढळून आले आहेत.
भुसावळमध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. तो अयोध्या येथे गेला असता तेथून आल्यानंतर त्याला न्युमोनिया होवून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
दुसरा रूग्ण हा जळगाव शहरातील आहे. त्याच्यवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचे नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवाय जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सज्ज आहे. नागरिकांनी देखील घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.