चाळीसगाव जवळ कन्नड घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू…
चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीचा देखील समावेश आहे.
देवदर्शनावरून घरी येत असताना चाळीसगावाजवळील कन्नड घाटात रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळली. गाडीमध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते. त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला एक पुरुषाचा समावेश आहे.
गाडीतील सर्वजण हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. घटनेची माहित मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जखमींना पोलीस प्रशासनाच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.