गोर बंजारा समाजाचा जळकाेट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको…
गोर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोर बंजारा समाजातील सर्व संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी महामार्गावर तासभर आंदोलन करण्यात आल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणार्या व अवितरित करणार्या संबंधित अधिकार्यांवर व लाभार्थीवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नियुक्त करा.
सन 2017 चा रक्त नातेसंबंधीचा जीआर त्वरीत रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.गोर बंजारा समाजातील सर्व संघटनांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी आंदाेलकांनी महामार्गावर घाेषणाबाजी केली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खाेळंबली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाेलिसांनी महामार्गावर तसेच आंदाेलनस्थळी माेठा पाेलिस बंदाेबस्त ठेवला हाेता.