अपडेटगडचिरोलीशैक्षणिक

गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, धक्कादायक घटना…

Share this post

गडचिरोलीतील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. गडचिरोलीतील शासकीय आश्रमशाळेत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

धानोरा तालुक्यातील सोडे या गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या माध्यमातून शासकीय मुलींची आश्रमशाळा चालवली जाते.सदर आश्रमशाळा केवळ मुलींसाठी असून धानोरा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील जवळपास ३८० आदिवासी मुली निवासी स्वरूपात शिक्षण घेतात.

नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थिनींना दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले.कोबी भाजी, वरण,भात असे जेवण केले. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थिनींच्या पोटात दुखने, काहींना चक्कर येणे तर मळमळ वाटणे सुरू झाले. याची तक्रार विद्यार्थिनींनी शाळेच्या शिक्षकांकडे केली.

लगेच येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी रुग्णवाहिका बोलावून तब्बल १०० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना धानोरा तालुका मुख्यालयात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.याची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी धानोरा येथे धाव घेतली.त्यातील काही विद्यार्थिनिंची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा मुख्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

ही घटना उघडकीस येताच आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तब्बल १०० हून अधिक विद्यार्थिनींना विषबाधा होणं ही घटना मोठी आहे. या घटनेबद्दल माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन पुढे काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सध्या प्रकृर्ती स्थिर असल्याची माहिती येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमणकर यांनी दिली आहे. काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळतेय.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *