केंद्र सरकारने या हंगामात ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर घातली बंदी…
केंद्र सरकारने काढलेल्या या आदेशामुळे सर्व साखर कारखान्यांना मोठा धक्का बसला आहे.केंद्र सरकारने या हंगामात ऊसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातली आहे.
देशातील बाजारपेठेतील साखरेची कमतरता भरून काढण्यासाठी केंद्र सरकराने या हंगामात ऊसापासून इथेनॉल बनवता येणार नाही असे आदेश दिले आहेत.खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सर्व साखर कारखाने आणि डिस्ट्रिलरीच यांना यासंदर्भात तातडीने इथेनॉलच्या उत्पादनासाठी ऊसाचा वापर करू नये असे आदेश दिले आहेत.
सरकारचा हा निर्णय साखर कारखान्यांसाठी मोठा झटका मानला जातो. कारण त्यांचे ८० टक्के उत्पन्न इथेनॉलपासून येते. इंडियन शुगल मिल असोसिएशनच्या मते २०२३-२४ मध्ये उत्पादन ८ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
भारतात सुमारे 40 ते 50 लाख हेक्टर वर उसाची शेती केली जाते. त्यातही 80 टक्के शेतकरी हा गुंठ्ठ्यात शेती करणारा आहे तर 20 टक्के शेतकरी एकरी उसाची लागवड करतो. त्यामुळे भारत दुसऱ्या क्रमाकांचा साखर उत्पादक देश आहे.
या वर्षी देशभरात पाऊस कमी पडला असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते, त्यामुळे या वर्षी कमी पाण्यामुळे कमी ऊस शेती केली आहे. यामुळे साखरेचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे ऊसाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने कारखान्यांना नोटीफिकेशन काढत मोठा झटका दिला आहे.