आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुका…
आज जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचे मतदान होणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये सहभागी असतात.सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठी या निवडणुका होणार आहेत.राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच मतदारांचा कल यातून समोर येणार आहे.त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील विविध मतदान केंद्रांवर आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. याची मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल.