अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करुन निधी मागणीचा प्रस्ताव सादर करा. – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत, आणि 33 टक्क्यापेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.