अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अखेर जाहीर…
अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त अखेर जाहीर झाला आहे. २२ जानेवारी रोजी तिसऱ्या सत्रात ही प्राणप्रतिष्ठा होईल. संपूर्ण देशात उत्सव साजरा करण्याचे आणि घरोघरी अनुष्ठान करण्याचे आवाहन केले जाणार असून संपूर्ण देशभरातील वातावरण उत्साहाने भारलेले केले जाणार आहे. चौथ्या सत्रात देशभरातील भक्तांना रामलल्लाचे दर्शन करता येईल, अशा प्रकारचे नियोजन केले जाणार आहे. हा टप्पा २६ जानेवारीला सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल.
२२ जानेवारी रोजी अभिजित मुहूर्त मृगषिरा नक्षत्रामध्ये दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील. या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी साकेत निलयममध्ये रविवारी संघ परिवाराची बैठक झाली. त्यामध्ये या सोहळ्याची चार टप्प्यांत विभागणी करून तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.