अपुऱ्या झोपेमुळे उद्भवत बऱ्याच समस्या…
तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक सलग झोप घेत नाहीत त्यांना सर्वसामान्यांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असतो. अपुऱ्या झोपेमुळेदेखील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत शकते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक तयार करते. ज्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण वाढतो. अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो.त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. औषधांशिवाय उच्च रक्तदाब कमी होत नाही.
पुरेशी झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी काही गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे.
१) झोपण्याची एक वेळ निश्चित करा. त्यापूर्वी सोशल मीडिया, टीव्ही, मोबईलचा वापर करणे टाळा. पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे तसेच गरम पाण्याने आंघोळ केल्यास नक्कीच फायदा होईल. सोशल मीडियाचा वापर करण्यापेक्षा ध्यानधारणा करा आणि मग झोपा.
२)झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी सर्व काम संपवा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करा. तुमच्या बेडरुममधील लाईट बंद करुन शांत आणि चांगल्या झोपेसाठी वातावरण निर्मिती करा. खोलीतील वातावरण थंड असेल याची खात्री करून घ्या.
३)नियमित व्यायाम केल्याने झोपेचा कालावधी आणि गुणवत्ता हे दोन्ही सुधारण्सास मदत होते. झोपण्यापुर्वी व्यायाम करणे टाळावे.दिवसभरात किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. वेगाने चालणे,जॉगिंग करणे किंवा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या वेळी कॅफिनयुक्त पेयांचा वापर करणे टाळा.
४)अपुरी झोप आणि उच्च रक्तदाब यांच्यातील परस्परसंबंध ओळखून संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या. रात्रीच्या वेळी पुरेशी विश्रांती मिळाल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते. उच्चरक्तदाबासारख्या गंभीर आरोग्य समस्येला प्रतिबंध करण्यासाठी चांगल्या सवयींचे पालन करा.